तु किती सुंदर आहे.( प्रेम )
मन प्रेमळ तुझे ग
सांगु तुला मी कसे.
एकदा तरी विचार मनाला
तु किती सुंदर आहे.
तुझे मधाळलेले डोळे
ओठ जणु गुलाबा सारखे.
गालावरी तुझ्या हास्य खळी
तु किती सुंदर आहे.
तुझा निरागस चेहेरा
बघुनी मी मोहुन गेलो.
प्रेमात पडलो मी तुझ्या
तु किती सुंदर आहे.
मनात तु घाबरली
का अशी हिरमुसली
अग वेडे बघ आरसा
तु किती सुंदर दिसली.
सौ. जान्हवी. जोशी.
