उधळले रंग मी
उधळले आज मी
रंग नव्या जीवनाचे
रंग होते तुझ्याचसाठी
तुझ्या माझ्या मिलनाचे....
उधळले आज मी
रंग अपुल्या प्रेमाचे
सूर गुंजले हृदयी तुझ्या
हे रंग होते भावनांचे.....
उधळले आज मी
रंग नव चैतण्याचे
रंगली तू रंगलो मी
रंग तुझ्या स्पर्शाचे.....
उधळले आज मी
रंग इंद्रधनुष्याचे
सप्तरंगात फुलली तू
रंग प्रीतवेड्या गुलाबाचे.....
उधळले आज मी
रंग पळस फुलांचे
तुझ्या माझ्या प्रीतीचे
रंग केसरी त्यागाचे.....
उधळले आज मी
रंग रंग नवे नवे
समृद्ध जीवनासाठी
असतील जे हवे हवे......
सत्तु भांडेकर
