रामायण काव्य.
"रामायण काव्य."
अयोध्येचा राजा दशरथ
रोज मागतो देवाला.
पुत्र घाल माझ्या झोळी
राजा नाही या गादीला.।1।
ऋष्यशुंगंऋषी च्या हातुन
यज्ञ झाले पुत्रकामेष्टी.
पायस खाऊनी राण्यांना
गर्भधारणा ती झाली.।2।
चैत्र शुद्ध नवमीला
पुत्र झाले तिन्ही राण्यांना.
गुढी-तोरणे उभारुनी
आनंदुन गेली अयोध्या.।3।
पुत्र झाले चार दशरथाला
राम,भरत,लक्ष्मण,शत्रुघ्न.
दिवसा मासे ते मोठे झाले
हुशार होते ते धनुर्विद्येत.।4।
सीतेचे मन आले रामावर
स्वयंवर व्हावे त्यांच्या सोबत.
शिवधनुष्य तोडले रामाने
रामसीतेचे झाले स्वयंवर.।5।
मंथरेने कान भरले कैकईचे
भरताला ते राज्य मिळावे.
रामासहित सीता लक्ष्मण
चौदावर्षे वनवासातच जावे.।6।
मंथरेच्या सांगण्या वरुन कैकईने
दशरथाला आठवण करुन दिली.
दोन वर मागुनी घेतले
प्राणास त्यागले दशरथानेही.।7।
अयोध्येतुनी निघुनी राम सीता
लक्ष्मणासहीत चित्रकुटपर्वतावरी.
भरत गेले आणन्या सर्वासहीत
राम भरत भेट तीथे घडली.।8।
लक्ष्मणास बघुनी शुर्पनखा
त्याच्या कोमलकांतीवर भाळली.
वरावे लक्ष्मणा आपणच आता
त्याने विद्रुप केले तीचे नाक कापूनी.।9।
सोनेरी तो म्रुग बघता
भाळली सीता त्यावरी.
हट्ट केला रामाजवळ
कांती हवी त्या सुवर्ण म्रुगाची.।10।
राम गेले म्रुगाच्या मागे
कांती त्याची आणायला.
वाचवा वाचवा आवाज रामाचा
लक्ष्मणही गेले आखुनी रेषा.।11।
रावनाचे मन वाईट
सीता कशी आपल्याला मिळेल.
पंचकुटीतुन सीता हरण केले
घेऊनी गेला तीला लंकेत.।12।
सीतामाईला वाचविण्यात
जटायुने त्यागले प्राण.
किष्किंधेत भेटले ते सर्व
राम, हनुमान,सुग्रीव,जाम्बुवंत.।13।
शोधण्या त्या सीतामाईला
समुद्र उल्लघुनी गेले मारुती.
दिसली ती तेजस्वी माऊली
आले परत लंकादहन करुनी.।14।
समुद्रावर उभारुन सेतू
रामासहित गेली वानरसेना.
रावणाला मारुनी त्यांनी
सोडवीले त्या सीतामाईला.।15।
अग्नी परिक्षा ती दिली
सीतामाईने आपली.
पवित्रतेची मुर्ती होती
अग्नीमधुनी बाहेर ती आली.।16।
राम,सीता,लक्ष्मणा सहित
मान्यवर आले अयोध्येत.
राज्याभिषेक झाला रामाचा
आले रामराज्य अयोध्येत.।17।
सौ. जान्हवी जोशी.
