पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

अक्षय्य

अक्षय्य

माहीत नाही कुठून
या अशा अलगद येती l
किती दडवल्या तरी
मनी झाकोळून जाती ll

काही सुखद बापुड्या
पुलकित करी मना l
काही दुःखद अपार
विसरणेच बरे म्हणा ll

एका काळातून दुज्या
नकळत मना नेती l
कप्प्यात या मनाच्या
कशा चौफेर फिरती ll

कधी मधुर क्षणांच्या
ठेवती पाऊलखुणा l
कधी अश्रू बनून डोळा
आणती हृदयीची वेदना ll

देतात एकटेपणात
कशी हक्काने या साथ l
म्हणूनच खुळ्या मनाला
या सतत भावतात ll

या आठवणी मला
नित्य अक्षय्य वाटती l
येती मनातून ओठी
पुन्हा मनीच विसावती ll


वैशाली निकम
औरंगाबाद

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू