पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

माझी लेखणी

माझी लेखणी 


एका निवांत संध्याकाळी कधी

माझ्या लेखणीला पंख फुटले

कल्पनांच्या भराऱ्या घेत घेत

शब्द कागदी अभाळभर उडले


हळूहळू सखीच झाली लेखणी

मनातले विचार व्यक्त करणारी

तिच्या साथीने शब्दबद्ध  केले

भावभावनांचे आवर्त कितीतरी 


कधी दाटून येतं मनभर आभाळ

तेव्हा माझी लेखणी पाऊस होते

आनंदाच्या ती कित्येक प्रसंगांना

गंधाळ शब्दांचं छान अत्तर लावते


सगळं जग जेव्हा परकं होत गेलं

तेव्हा नातं माझं आणि लेखणीचं 

अगदी दाट बंधनात बांधलं गेलं

त्यावर शिक्कामोर्तब झालं मैत्रीचं 


माझी लेखणीही करते मनमानी 

कधीकधी होते तीही उगा लहरी

माझ्यावर रुसूनच बसते लटकी

तर कधी शब्दांच्या धुवांधार सरी


© दीपाली

सौ. वैदेही कुलकर्णी, कराड

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू