पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शब्दफुलांचीओंजळ

 

 

दु:ख माझे लिहिताना

कागद मज बोलला

तुझा अत्याचार मला

कीती बरे सलला... 

 

तुझे दु:ख होते ना

मग तुच पचवायचे

माझ्यावर का तुझे

शब्दओरखडे ओढायचे...

 

दु:ख सहन होत नाही

का करतेस प्रेम कुणावर

सहनशक्ती पल्याड गेलं की

शस्त्र पारजते माझ्यावर... 

 

सगळ्यांसाठी सगळं करते

स्वत:साठीही काही कर

मग माझ्यावर दिलखुलास

शब्दांचीओंजळ रीती कर... 

 

सौ. अलका माईणकर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू