पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

तुळस

तुळस

सावळसांज होताच
तुळस प्रसन्न हसली
पणतीच्या प्रकाशात
शांत,सोज्वळ भासली...

घराच्या दारासमोर
तुळशी वृंदावन शोभे
कृष्णा सोबत सहवास
तिला वृंदावनीच लाभे....

घरातली तुळस असते
पावित्र्याचे मंगल स्थान
रोज पाणी घालावे तिला
मिळेल सौभाग्याचे दान....

प्राणवायू पुरवते तुळस
आयुर्वेदात तीची शान
घरात तुळस असावीच
जिथे सांजवातीला मान...

सौ. अलका माईणकर
अकोला

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू