पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आह्वान मनाचे

"आव्हान मनाचे"

मरण कुणालाच चुकत नाही पण
तीळ तीळ नाही मरु
मनावर होतील आघात इतक्या
अपेक्षाही नाही करू

निर्रथक वाद नको कुणाशी
मनीच्या अहंकाराला आवरु
दिवस रात्रीच्या क्षणिक खेळात
का कुणाचा अनादर करू

सुखाची मिळते सावली जेव्हा
दुःखाचे ऊन जाते सरू
संकटाच्या वादळांना जाया सामोरी
धैर्याचे आव्हान पांघरु

नको उपकार नको मदतही
खोल जख्म ही जावी भरु
उगाच दिखावा करण्या साठी
कर्ज बाजारी नाही उतरु

ठेच लागते जेव्हा पाया
कठीन मार्ग ही जाती हरू
सफलतेचे श्रेय येता हाती
संघर्षाचे दिवस जाती विसरू


-कीर्ति अग्रवाल

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू