शब्द
शब्द....!!
शब्द असती ध्यास माझे
मनाच्या क्षितिजावरी
शब्दची लाभती श्वास
मजसवे राहती ते अंतरी
शब्दांची ही किमया सारी
अलंकार होऊनी सजती
यांच्यासवे गंमत न्यारी
एक-एक सहज उमगती
शब्दांचे हे खेळ अनोखे
शब्दच बनती सवंगडी
एकामागून एक सारखे
जसे फुलती फुलझडी
गुपित या शब्दांचे किती
सांगू मी आणखी कसे
तारणहार मजला होती
मानू मी उपकार कसे
-----शुभा ©