पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सोनसकाळ

  🌞 सोनसकाळ 🌞


झाडामागून अवचित कुठूनी

आदित्य झाला गोळा

सवे तयाच्या नवतेजाचा

नभावरती भरला मेळा

      प्रसन्न लोभस रुप तयाचे

      शिरोमणी हा जगताचा

      सहवासाने कृपा घडवितो

      उत्कर्ष करितो सृष्टीचा

अढळ तयाचे सिहासन

तेजाळल्या दाही दिशा

रोज नव्याने पुलकीत

होती इथे जनांच्या आशा

        रोज क्षितिजी येणे याचे

        कधी गुढ धुक्यात हरवणे

        उन्मत्त मनांना हरवणे याचे

        अविरत निःस्वार्थी उगवणे

क्षितिजावरी मुक्काम याचा

हरदिन प्रकट होतो हा

सुखावतो सहवास तयाचा

नितदिन प्रेरक ठरतो हा

      तेजोगोल हा असा लाभला

      कृतकृतार्थ जीवन झाले हो

      याच्यासवे मनतृप्त जगणे

      हर्षोल्हासित झाले हो

-----शुभा ©



पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू