कविता बाप गुरू
बाप गुरू
बाप असतो पहिला गुरू
पहिलं बोट धरून बापच
आधार देतो
पहिलं अक्षर गिरवायला
बापाचाच हात असतों
सायकलवर आयुष्य
काढणारा मुलाला स्कुटी
घेतल्याशिवाय समाधान
चेहऱ्यावर पेरत नाही तो
बापच असतो
ऐकेल तोपर्यंतच शिकवण
देणारा व छिद्रेंअसणारं बनियन
घालून प्राजक्त फुलांचा सडा
लेकरांच्या अंगणात उधळतों
तो असतो बाप
मुलीच्या स्वर्ग सुखासाठी
नरक यातना सोसणारा बापच असतो
बाप तुमचा आमचा सेम असतो
कष्टाच्या घामाने चिंब होणारा
कुटुंबाचं श्रावण करणारा बापच असतो
डोक्यावर छत्र असतो बाप
आयुष्याचं पहिलं सत्र असतो बाप
डॉ.अनिल कुलकर्णी
ं
