अनाथांची माय
अनाथांची माय ✍️
पर्वताएवढे दुःख
नाही डगमगली तू
ईश्वराचीच परीक्षा
घेण्याचे ठरविले तू.......
अभ्रू वाचविण्या तूझी
स्मशान घर बनलं
भाकरी भाजण्या तूला
प्रेतच बनलं चूल.......
रणरागिणी बनून
पुन्हा उभी राहिलीस
अनाथांची माय झाली
मातृछञ बनलीस.....
घास मायेचा प्रेमाने
अनाथांना तू भरवी
कर्तृत्व सामर्थ्य तूझे
भल्याभल्यांना लाजवी.....
शून्यातून परमात्मा
प्रवास नव्हता सोपा
उडून गेली पक्षीण
रिकामा झालाय खोपा ......
वटवृक्ष फोफावला
हजारो पक्षी तयात
सदैव जागृत राही
मायेची ऊब तेवत .....
सौ.सुचिता निलेश बुधे