पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कविता

स्वातंत्र्याची ७५ वर्षे


झाला सूर्योदय स्वातंत्र्याचा!

स्वातंत्र्याची पंचाहत्तर  वर्ष!

अमृत महोत्सव  करू यंदा,

भारतीय जन मना वाटे हर्ष!!१!!


घरोघर तिरंगा फडकवू सारे!

राष्ट्रसण आपले साजरे करू!

ज्ञानवंत होऊनिया राष्ट्र प्रेमी,

कास विकासाची सारे  धरू!!२!!


राष्ट्रीय  एकात्मता  राखावी!

राष्ट्र प्रेमाचा भाव मनामनात!

सर्व धर्म समभाव रक्षा करू,

प्रेम ज्योत लावू  जनाजनात!!३!!


स्वातंत्र्यासाठी लढले शूरवीर!

आहुती देत प्राणा आले मरण!

वीर हुतात्मे भारतमाता सुपुत्र,

ठेऊ सदा त्यांचे आम्ही स्मरण!!४!!


जगी एक  आहे सत्य जाणा!

आपला देश हा  भारत माता!

वंदे मातरम  मुखी जय  हिंद,

मिळे  स्फूर्ती  राष्ट्र गीत गाता!!५!!


वाटचाल आमची सुरू आहे!

जगात  होण्यासी  विश्व गुरू!

जाती धर्म पंथ भेदाभेद देशा,

आम्ही सारे भारतीय दूर करू!!६!!


श्रीगुरु रामकृष्णादादा महाराज 

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू