कृष्ण मनातला
सप्तरंगातला एक रंग नेमका
ओळखून यायला हवा उन्हातला
राधा जाणून घेण्यासाठी तसाच
कृष्ण समजायला हवा मनातला.
अनय ,विनय कसरतीचा अभिनय
सारे सर्वांनाच जमतेच असे नाही
संकटं असतातच भोवती विखुरलेली
कान्हा येतो धावून दिसेलच असे नाही
अंतरीची ओढ नक्कीच कळून येते
मनातल्या कृष्णाशी सख्य जुळून येते
तसंही सावलीशी नातं दृढ सावळ्याचं
मनातला कृष्णही मन समजून घेते...
©® सदासन