राष्ट्रध्वज
राष्ट्रध्वज
तीन रंगी
शौर्य,शांती
क्रांती अंगी ॥१॥
देश प्रेम
ह्रदयात
एकमेकां
देती हात॥२॥
एकमेव
देशभक्ती
लढण्यास
देते शक्ती ॥३॥
जन गण
बहुमान
शहिदांनी
दिले प्राण ॥४॥
घडविता
इतिहास
महोत्सवी
दिन खास ॥५॥
तिरंगा हा
घरोघरी
आनंदाच्या
या लहरी ॥६॥
अशोक रजपूत
