पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

कवीची अबोल वेदना



कसे वर्णनावे कवीने

कवीची अबोल वेदना 

कागद लेखनीच्या मनात

दौडती असाह्य सामना ॥१॥


सोसल्या या प्रवासात 

त्यांने काट्यांच्या यातना

तरीही समाजासाठी

विणल्या शब्दांच्या भावना ॥२॥


रोखठोक त्यांची वाणी

धरते सत्याची कास 

अपशब्दांच्या मारेतूनही

वाढे लिखाणाची आस ॥३॥

 

सुख दु:खात साथीदार

देहांवर लावता जीव 

अनिष्ट परंपरांचे मुळ 

वर्णता येतो मनाला कीव ॥४॥


साकार होते जीवन

या सर्व प्रवासातून 

ह्रदयाची वाजते त्याच्या

सप्तरंगी उल्हासित धून ॥५॥


कवी.डाॅ.अशोक रजपूत

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू