पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्वप्नांचा गाव

प्रत्येक नात्याला
हवंच का काही नाव
कुणाजवळ तरी असावा
आपल्या स्वप्नांचा गाव

दुरुन ही पुसता यावं
थोडं पापणीतलं पाणी
ओठांवर देता यावी
हळवी गुलाबी गाणी

रिकाम्या मनाची
थोडी भरता यावी ओंजळ
काही रितं करतानाही
देता यावी कबुली प्रांजळ

आभाळासारखं सदोदित
असण्याचा द्यावा विश्वास
मनमोकळं बहरण्याचा
थोडा मिळावा श्वास

आपल्या असण्याचा
कुणाला तरी असावा मोह
आपण नाहीत म्हणून
कुणाचे डोळे व्हावे डोह

पावलांनी बिनधास्त चालावं
अशी सोबत आहे म्हणून
लुटुन घ्यावे आनंद सारे
जगणं व्हावं भरभरून

मनस्वितेच्या अशा कळ्यांना
थोडं असं फुलवून बघ
जिवांभावांचे मैत्र असे
जोडून तर बघ..

✍️ शारदा

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू