काव्यबत्तीशी...९/७/९/७
*वाचा पटदिशी...पुन्हा नव्याने छान काव्यबत्तीशी*
*काव्यबत्तीशी सदर भाग २५९*
*नववधू ...९/७/९/७*
आली वरात दारी
सनई-चौघडे वाजत...
सखी ही आतुरली
कावरी-बावरी लाजत..."१"
भरला हाती चुडा,
छान मेहंदीही रंगली...
सखी सख्याची होण्या
कशी स्वप्नमयी दंगली..."२"
साजशृंगार केला
नववधू ही बावरली...
पाहूनी सख्यास ती
क्षणात स्वतः सावरली.."३"
सुगंधित मोगरा
कुंतलात सखी ही माळी...
सख्या प्रेमस्पर्शाने,
कुंकू भरतो तिच्या भाळी..."४"
शोभा वाढे मंडपी,
नवरा नवरी नटले...
आज सर्वांच्या साक्षी,
प्रेमबंधनी अडकले..."५"
बापाचा अभिमान,
मुलगी निघाली सासरी...
बापाच्या काळजात,
वाजे आठवांची बासरी..."६"
सोबतीला घेतला
संस्काराचा सुंदर ठेवा...
आईबापाही वाटे
मग लेकीचा खुप हेवा..."७"
स्वर्गात बांधलीया
छान राजाराणीची जोडी...
संसारात फुलेल,
प्रेमाची अवीट ती गोडी..."८"
दोन कुला उद्धारी,
सख्या देई प्रेमाने साथ...
सुख-दुःखावरही
करी प्रेम फुंकर मात..."९"
.
*सौ.आश्विनी श्रीहरी मेंगाणे*काव्यबत्तीशी निर्मात्या*
*१६/९/२२, शुक्रवार*
