हरितालिका
हरितालिका
श्रेष्ठ भारत संस्कृती
असे जगती महान
परंपरा व्रताचार
मिळे श्रेष्ठ ब्रह्मज्ञान
येता भाद्रपद मास
व्रत ये हरतालिका
शंभू सममिळे पती
आचरती कुमारिका
कुमारिका संगे व्रत
करी ते सौभाग्यवती
व्रत केले उमा तैसे
शत जन्म मिळे पती
व्रत आचरती नारी
संग हो जीवनी पती
गृही शिव पिंड पूजा
भावे उपास आरती
शंकराची होये पूजा
रुई बिल्व पत्र देती
भक्तीभाव मनी असे
दुःख ताप शंभू नेती
सुखानंद धन मिळे
शांती तैसी ये समृद्धी
शिव राम कृष्ण हरी
कृपा भक्तावरी वृद्धी
आहे प्रतीक भक्तीचे
नारी करती प्रार्थना
व्रत भावे हरतालिका
पूर्ण हो मनोकामना
श्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा महाराज पाटील, जामनेर