श्री गणेश
माझा बाप्पा किती । दिसतोय गोड ॥
नाही त्याला तोड । आसमंती ॥१॥
आसमंती गुंजे । त्याचे एक नाम॥
भूमीवर धाम । बांधीले मी ॥२॥
आघाड्या दुर्वांत । जास्वंदीस मान ॥
मोदकांची शान । निराळी ती ॥३॥
भक्तगण येती । माथा जे ठेवती ॥
देसी त्यांना गती । जीवनात ॥४॥
विद्यांची देवता । प्रथम तू पुज्य ॥
आगमनी सज । पृथ्वी लोक ॥५॥
दर्शनासी झाले । आतुर हे मन ॥
एक एक क्षण । वर्षा सम ॥ ६॥
