व्याकरण
कविते तुझी अन् माझी
संज्ञा एक आहे
वाक्प्रचार अन् म्हणीचा
अर्थ एक आहे ....
कशास करतेस तु ही
मजवर प्रश्न चिन्हांचा मारा
सुटे उद्गार वाचकांचा
सुगंधी मंद वारा ....
अडखळतेस मध्येच असे का?
जसे अर्धविरामा प्रमाणे
मधूनच येता मनी तुझ्या
स्वल्पविरामांचे गाणे ....
परस्पर संबंध जोडण्यास
आवश्यक असे संयोग
अपसरणाचा आता
कधीच नको प्रयोग ....
अहंकार जळून जाईल
माझा अवतरणात आता
शेवटी आम्हींही लावतो
पूर्णविराम जाता जाता....
डॉ अशोक रजपूत
