नेहरुंचा गुलाब
अवखळ भारी
कल्पनेची भरारी
चिकूच्या खोडीने
होती हैरान सारी.
उपाय सारे थकले
आजीचे केस पिकले
म्हणायची हात टेकून
" मी होते म्हणून टिकले".
लावायला जावे वळण
चिकू घ्यायचा पळण
ध्यानात काही शिरेना
डोक्याची झाली चाळण
तेव्हा आठवले नेहरु
उपाय केला सुरु
खोंड होता होताच
शहाणं झालं वासरु.
प्रेमळ आजीचा जाब
नातवाने राखला आब
चिकूने दिला सर्वांना
चाचा नेहरुंचा गुलाब.
©® सदासन