कोजागरी
कोजागरी
आज माझे मला कळेना
कोण भासे अधिक सुंदर?
कवेतला मुख चंद्र की
कोजागिरीचा सुधाकर?
एक भासे शांत शीतल
चांदण्यांची शोभे झालर
काय वर्णावे रूप दुजाचे
गर्भरेशमी सळसळे पदर
नैवेद्य तुला अर्पिती सारे
दुधात पिस्ता अन केशर
प्रियेच्या ओटीत तारका
प्रेमाला येई आज बहर
पसरले शरदाचे चांदणे
खुलले कोजगिरीचे अंबर
कवेत प्रतिमा त्याची भासे
मिटून जाई सारे अंतर
©️®️ अश्विनी परांजपे - रानडे
कोजागरी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा...
