पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

चला वाचवू सगळे पक्षी

"चला वाचवू सगळे पक्षी"

 

कोकीळ गाते गाणी गोड

पोपट खाते पेरूची फोड.

 

चिवचिव चिमणी दाणे टिपते

हंसाला पाहून डोळे दिपते.

 

कुहुकुहू कोंबडी देते बाग

माणसाला सांगते कामाला लाग.

 

बदकाला नाही कुठलाचं डाग

कावकाव कावळ्याला भलताचं राग.

 

फुलवित पिसारा नाचतो मोर

गरुडाची झेपचं थोर.

 

रंगीबेरंगी पक्षी छान

ऐकून किलबिल हरवते भान.

 

निसर्गाला ठेवू साक्षी

चला वाचवू सगळे पक्षी.

 

©® विशाल कन्हेरकर.

  निंभा.ता.भातकुली,

  जि.अमरावती.444602

मो.9172298839.

ईमेल :- shabdasnehi@gmail.com

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू