हे दुःख अंतरीचे
हे दु:ख अंतरीचे अडवायचे कशाला
शब्दांत मांड सारे दडवायचे कशाला....
नेले जरी मनाला वाहून भावनांनी
डोळ्यातल्या घनांना रडवायचे कशाला
सारे सखे सुखाचे अंदाज व्यर्थ जाती
दुःखात माणसांना बडवायचे कशाला
बघ भावना मनाच्या काळोख दाखवे हा
मौनात जीवनाला घडवायचे कशाला
डोळे दिपून जाती पाहून भाव सारे
या प्राण वायुने मज जगवायचे कशाला
डॉ अशोक रजपूत
