पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

पर्यावरणाचे रूदन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 


प्लास्टिक प्रदूषण विरुद्ध लढा

               कविता----

             शीर्षक-- पर्यावरणाचे रुदन 


पर्यावरणाचे रूदन ऐकताय ना

 प्रदूषित झाले सारे वातावरण 

कमी झाली भूमीची उपजाऊ क्षमता 

तिच्या हरितकांतीचे होताहे अपहरण.


 श्वेत वस्त्र प्लास्टिकचे ल्याली ही धरा

 या वस्त्रात तिचा जीव तळमळतो

श्वास घेणे झाले कठीण या मातीला 

दुर्दशा बघूनी तिची जीव हळहळतो. 


विज्ञानाचे वरदान प्लास्टिक की शाप 


दीर्घायुष्याचे कवच घेऊन आले या पृथ्वीवर 

अस्त्र शस्त्र विनाच लढले युद्ध मानवाशी 

गदाच फिरविली प्राणी मात्राच्या अस्तित्वावर. 


सतर्क व्हा जागरूक व्हा जनांनो

 बंद करा मित्रांनो वापर प्लास्टिकचा 

विविध आकर्षक रूपात मोहिले विश्वाला 

जग बळी पडले नाश झाला पर्यावरणाचा.


 नद्या सागर झाले आगर प्लास्टिकचे 

समुद्री जीवन जलचर धोक्यामध्ये आले  


विघटित न होणारे हे प्लास्टिक

 सतत विषारी रसायन ओकत आले.


 प्लास्टिकचे स्थान घेऊ द्या पारंपारिक वस्तूंना

 मातीची भांडी, पिशव्या कपड्यांच्या, केळीचे पान 

पुनर्नविनीकरण न होणाऱ्या प्लास्टिक ला टाळा 

प्लॅस्टिकला ना जाळू ना गाडू जमिनीत याचे असावे भान


 अनेक आजारांचे कारण प्लास्टिक 

प्लास्टिकच्या महासागरांनी व्यापले या धरेला

 मानव वनचरांच्या पिढ्यान पिढ्या  खाणार हे प्लास्टिक

 आत्मचिंतन करा आणि वाचवा या पृथ्वीला या पर्यावरणाला.


 कर्तव्य आमचे पर्यावरणा प्रती 

सुरक्षित ठेवायचे आहे या देशाला

 सशक्त कायदा दृढ संकल्प आमचा 

शपथ आमची जीवनातून टाळू प्लास्टिकला.


सौ.विद्या श्राॅफ 

बर्हाणपुर 

मो.7999498370

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू