पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आतुरता पावसाची



वेशीपर्यंत आलास तर 

नवरीसारखा लाजू नको

माप ओलांडून लवकर ये

कंजूसपणा करू नको ….


चोर पावलांनी येऊ नको

राजा सारखा वाजत गाजत ये

मन मोकळं बरसत

शेतकऱ्यांचा घरात डोकावून ये ….


पान फुलांना भिजवत

पक्षी पाखरांना नाचवत ये

आसुरलेल्या मनाला रिझवत

प्रेमी युगलांना गाणी दे ……


वाफाळलेला चहा घेत

गरमागरम भज्यासाठी ये

झिंगझिंग  झिंगाट करत 

एक सेल्फी काढायला ये ….


      सुरेखा नंदरधणे✍️

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू