दीपावली
साहित्य दीपावली
तेजोमय दीप ज्योती
तिमीर हारक सरस्वती
अनादी अनन्त तू निर्मोहक
त्रिगुणात्मक सत्व प्रकाशक
सकळ कला विद्येची कारक
ज्ञान वैराग्य वाचस्पति
तमोगुण तू नाशकरक
धी धृति स्मृती कारक
विद्यावन्त कला दायक
देवादीक पुजे ब्रहस्पति
तू सृजनाची माय दाता
सकलांची साहित्य सरिता
माय मराठी तू अमृता
लक्ष्य लक्ष्य दीप ज्योती
अक्षरांची शब्दकळा
शब्दांचा हिरवा मळा
नक्षत्रांच्या झुरमाळ्या
सृजन अंगण फुलती
रूप किती तुझे थोर
सप्तरंगी भाव विभोर
शब्द स्पर्श चित्तचोर
अलगद मज बिलगती
तिमिर हारक सरस्वती
प्रो डॉ प्रवीण जोशी
अंकली बेळगांव
कॉपी राईट 14 नोव्हेंबर 2020
