अप्सरा स्वर्गातली
स्वर्गातली अप्सरा
झाली गं बरसात
आलीया वावरात
धान बाई लावते
तिच्या शिवारात
चिखलानं माखली
नार बाई एकली
धान मुठीत घेतलं
लावत पुढे धकली
मनी सुखाचं तरंग
सुखवी चिखल रंग
आनंदाचं ये उधान
भिजलं सारं अंग
खरी तू अभिनेत्री
कष्ट दिवस रात्री
शेतशिवारात केली
तू पावसासी मैत्री
रोप लागलं शेतात
धान भरलं हातात
चालली पुढे बाई
सुगीचं गाणं गात
झाली गं पाठमोरी
कोण दिसे सामोरी
चेहऱ्यावरी हास्य
देवा दिली उभारी
रोप घेतले हातात
आली लावण्या भात
सौंदर्यात शृंगारली
भासे अप्सरा स्वर्गात
श्री.ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा महाराज पाटील