पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

स्वप्न

स्वप्न

मला दिसले स्वप्नात
स्वच्छ हवा शुद्ध पाणी
प्रदूषण झाले नष्ट
काय हवे तुला राणी....१

बोले झोपेत स्वतः शी
मज सांग ईच्छा तुझी
वर देते तूला आता
जागी कल्पकता माझी....२

नील वर्णी नभ असे
आभा नववधू दिसे
दंगे ना मौर्चे जगात
शांत ,गाव मज भासे.....३

जगी समूळ संपावा
भ्रष्टाचार ,अत्याचार
राज्य कर्त्यांच्या मनात
सेवाभाव हा विचार....४

पद लोकसेवा ज्यांची
मनी राहीलं आदर 
असो सैनिक,डॉक्टर
लीन होऊ जोडू कर....५

स्वप्न पडले साजरे
सारे विचार थिजले
डोळे उघडले आता
सारे पूर्वीचे दिसले...६

सौ.प्रज्ञा भारस्वाडकर ,पुणे.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू