बोका
बोका
काळा आमचा बोका
दिसतो कसा गुबगुबीत
नाकावर आला राग की
गुरगुर करतो डोळे वटारीत ….
इकडून तिकडे गरक्या मारत
घरातील दूध करतो फस्त
ओरडून ओरडून थकले मी
सांगा बरं लावू कशी शिस्त ….
मिशिवर ताव देत
रुबाब सर्वांवर करतो
असा ऐटदार बोका
मनीच्या मनात बसतो ….
सुरेखा नंदरधने ✍️