पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

हाहाकार

हाहाकार

कही पडतं साईलाई
कव्हा पडसी जोरानं
सोयाबीन जाते सारं
नदी नाल्याच्या पूरानं.......१

असा नको पडू राज्या
उर दडपतो माला
पंढरीच्या पांडूरंगा
नको घालू असा घाला......२

तुहा हाहाकार देवा
उत्तराखंडात पायला
गाड्या घोड्या जीव जंतू
पाण्यांत वाहिल्या............३

तुच माय बाप
सा-या दुनियेचा राजा
रानं चिभळतील सारे
नको देऊ असी सजा........४

आता तुह्या भरवश्यावर
कास्तकाराचं जगणं
नाही पिकली भूईमाता
एका भाकरीले मूखनं.......५

कवी प्रशांत पंडितराव मुसळे
मु.ब्रम्हा.पोष्ट.पिंपळगाव
ता.जि.वाशीम
९०२२१४९००२
२२/७/२०२३

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू