उगवला नारायण
तम दाटला नभात,झाकोळली ती रजनी,
एक तिरिप उजेड, आले प्रकाशपाऊल,
उठा उठा नारायणा, रामप्रहर झुंजूमुंजू,
मंद, धुंद, गार वारा, थंड वाहे मंद, मंद,
उगवला नारायण, सोनचाफा, सोनपंखी,
पांघरून पितांबर, अंगी लेऊन किरण,
शुभ्र पांढरा तो मामा, नभी रुपेरी रुपेरी,
एक लोणेरी तो गोळा, गुबगुबीत तो ससा,
चांदनी ती लुकलुके, तिची वेगळी ती प्रभा,
तम पसार माघार, उजाडले आता, आत्ता,
सोनपंखी किरणांनी न्हाली, न्हाली ती धरणी,
बाल्य भासे ती पहाट, कळी, फुले, कलरव, चिवचिव चिवचिव,
गंध भारला तो मनी, उरी मोतीया चैतन्य,
एका रथात आरूढ,नारायण,नारायण,
नारायण एक आभा, किरणांची प्रभा प्रभा,
नारायण ते जीवन, वैभव, वैभव. अन संपदा,
भासे किरण सुवर्ण, निर्मळ, निर्मळ, निर्लेप, निर्लेप,
उगवला नारायण, उगवला नारायण.????????????????.
