बाप्पाचे आगमन
बाप्पाचे आगमन...
चांगले वाईट;
हे शब्द आहेत,
वाईटातून चांगला बोध;
घेणार्याचा शोध आहे.
माझे आगमन होत आहे,
पुन्हा एकदा मनोभावे;
आमंत्रण मी स्वीकारत आहे;
आमंत्रण मी स्वीकारत आहे.
नका करू गजरात स्वागत;
पण DJ लावू नका रे;
सणासुदीचा आनंद,
मोजू नका पैशात रे.
दिखावा पाहिजे;
ही मोठी समस्या आहे,
सगळे मिळून सेवा करा;
तिच पोचपावती आहे.
गोजिरवाण्या भक्ताचा;
नका करू जाळ,
मिळू दे मलापण;
थोडा मोकळा काळ.
सगळेच छोटे मोठे;
आहेत मला खास,
भेटून घेऊ दे मला सार्यांना;
इतकीच मनी आस.
तुमचा सगळा देखावा;
मला परागंदा करतोय,
आरतीच्या गर्दीत हरवलेला;
माझा भक्त मी शोधतोय.
यावर्षी तरी थोडे,
तुम्ही साजेसे वागाल,
मीपण सोडून,
माझ्या आरतीला याल.
नाही मला अपेक्षा;
कुठल्याही गोष्टीची,
माझा आशीर्वाद;
तुमच्यातील माणुसकी.
Il गणपती बाप्पा मोरया ll
सौ. चंद्रलेखा धैर्यशील जगदाळे.
जयसिंगपूर