पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

संदेश देऊ मानवतेचा

कविता

 शीर्षक--संदेश देऊ मानवतेचा


आनंदाची उधळण झाली

 दीप उजळले आली दिवाळी पाहुनी ज्योत तिमिरही हसला 


  आरास दिव्यांची प्रकाश मनी वसला.


 दीप लावू दे समृद्धीचा 

गरिबा घरी एक दिवा आशेचा 

अत्तर लावूनी ज्ञानाचे

 हटवू या अभ्र अज्ञानाचे.


 होऊ दे अतिशबाजी प्रेमाची

 विरू दे सर ही दुःखाची

आंगण रांगोळीने सजवू या 

रंग स्वप्नांचे त्यात भरु या.


 मिष्टांनाची मांदियाळी 

भरवू या भुकेल्यास पुरणपोळी 


लक्ष्मीच्या पाऊल खुणा घरोघरी

 

 लेवून आली वस्त्र भरजरी.


 मनामनास हर्षविति 

आप्तजनांच्या भेटीगाठी

 पूजन करुनी धन्वंतरीचे

 मागणे मागू या स्वास्थ्याचे.


 भाऊबीज उजवू या प्रेमासाठी 


वितळू दे मनातील सर्व गाठी 


आकाशदिवा अंगणी सुसंस्कारांचा 


आनंदात संदेश देऊ मानवतेचा.


सौ.विद्या शरद श्रॉफ 

मो.7999498370

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू