पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दीप उजळले आली दिवाळी

आनंदाची उधळण झाली,
दीप उजळले आली दिवाळी...

तीन वर्षे करोनाचे सावट होते,
गळाभेट नव्हती जीवलगांची.
काय करावे कळतही नव्हते,
तगमग होती मनामनांची.||१||

ईश्वर कृपेने संकट टळले,
आता साजरी करू दिवाळी,
करुन लाडू, चकल्या, शंकरपाळे,
अभंग्य स्नानास उठू सकाळी. ||२||

घरोघरी आज दीपक ज्योती,
दारोदारी सुबकशी रांगोळी,
फटाके, अनार, चंद्रज्योती,
सजून आली, आली दिवाळी.||३||

विसरुन सर्व आता हेवेदावे,
एकमेकांस भेटू जीवेभावे,
समभाव प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे,
सर्वांना अपुले करुन सोडावे.||४||

विसरुनी ती संकट रात्र काळी,
स्वागत करुया शुभ सकाळी.
आनंदाची सर्वत्र उधळण झाली,
दीप उजळले, आली दिवाळी ||५||


मेधा विश्वनाथ फेणे.
सांताक्रूझ (पूर्व)
9769406686.

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू