पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

दिवाळी

कविता :- दिवाळी 

सोनेरी पहाट अशी जागली
चैतन्य नवे, धराही लाजली 
आनंदाची उधळण झाली 
दीप उजळले,आली दिवाळी 

छान काढली सुंदर नक्षी 
गातात गीत मधुर पक्षी 
अंगणी समृद्धीची रांगोळी 
रंगविण्या जीवन आली दिवाळी

चकली,करंजी,लाडू,फराळ खाऊ 
मामाच्या गावाला सारेच जाऊ
मिळून भेटून अवघे जगू प्रेमाने
करू हीच प्रथा नित्य नेमाने

नवे कपडे,नवे अलंकार
एकमेकांना देऊ उपहार 
प्रकाशाचा आदर्श ठेऊ सारे 
उजळण्या उघडी मनाची दारे 

सण साऱ्या सणात महान
किती गावे त्याचे गुणगान 
या जगण्यावर त्याचे ऋण 
पाहता सुख,नयन आले भरून

ठेवा आहे दिवाळीचा पदरात
प्रकाश राहू दे दारात घरात 
आनंद असा मावे ना गगनात
संदेश मोलाचा देई दिव्याची वात.




पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू