चांदण्यांना साथ
चांदण्यांना साथ
चंद्रमाची अशी
तिमिरातही चकाकी
नभाला जशी
शारदीय चांदणे
प्रकाशित अवनी
रम्य चांदण्यात
प्रेम दाटे मनी
पौर्णिमेच्या रात्री
थंड गुलाबी हवा
देह शहारतो
रोमांच नवा
निशा धुंद होई
नभी चाले खेळ
शरद पौर्णिमेला
दुग्ध शर्करा मेळ
जागरण पुजापाठ
रास खेळी ललना
उत्साह, आनंद
बहरतो जीवना
सौ. निता प्रवीण शेंडे, पाचोरा
जिल्हा.जळगाव
९४२२७७५३७३