अंतरंगी मोगरा
चांदण्यांच्या यामिनीत हि दाटला अंधार आहे
वाटते देहास या सौदामिनी चा भार आहे
काळजाला छेदणारा अंतरंगी मोगरा हा
हारताना डाव सारे तो सुगंधी वार आहे
संकटांना तोंड देता चालणाऱ्या पावलांचा
जीवनाच्या भावनेशी मांडला बाजार आहे
कल्पनेने बांधल्या मी लग्नगाठी ज्या तुझ्याशी
हाच सखये आपल्या या जिंदगीचा सार आहे
आरश्याला सांगतो बघ काळजाचा ठाव माझ्या
आरसाही बोलतो की मी कुठे लाचार आहे
Dr.Ashok Rajput
