पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

सावित्री तूझ्या लेकी

तू शिकलीस आई आमच्यासाठी,
 तू झिजलीसआम्हा घडवण्यासाठी,
 तू लढलीस आम्हा शिक्षणाचा हक्क देण्यासाठी,
 तू धडपडलीस आमच्या पंखात बळ देण्यासाठी,
 कारण तुला नव्हते मान्य.....पुन्हा बसल्या दगड मांडूनी,
 सावित्री तुझ्या लेकी...... ll1ll
 तुझ्यामुळे स्त्री घरा बाहेर पडली,
 शिकली अन हक्कासाठी लढली,
 आले पंखात बळ घेते उंच भरारी,
 राजकारणात प्रवेश करून बनली ती पुढारी,
 घर परिवार सांभाळून नोकरीही करते,
 तू दहावीला वाटेवर रोज पुढे सरसावते,
 करण तुला नव्हते मान्य,
 पुन्हा बसल्या दगड मांडूनी सावित्री तुझ्या लेकी.... ll 2ll
 तू शिकविले लढायला, अन स्वतःच्या पायावर उभे राहायला
 काट्याकुट्यातून  चालूनही, नवी वाट शोधायला
 चूल आणि मूल नाही,तर न स्वतःचे अस्तित्व घडवायला
 क्षितिजाच्या वाटेवर तोच पुढे चालायला
 कारण तुला नव्हते मान्य, पुन्हा बसल्या दगड मांडून
 सावित्री तुझ्या लेकी ll3ll
 ज्ञानाच्या सागरात तरंगणे शिकविले,
 हात पाय हलवूनी पोहायला शिकविले,
 अज्ञानाची कवाडे मोडून प्रकाशाची वाट दाविली,

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू