पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आला सण संक्रांतीचा...

आला सण संक्रांतीचा......


आला नवीन वर्षाचा 

सण पहिला हा आला

भोगी आणि संक्रांतीचा 

संगे करू  चला साजरा


सर्व भाज्यांचा फळांचा 

हंगाम हा चालू झाला

ताज्या भाज्या मटार 

गाजर,वांगी आणि शेंगांचा


भोगीची भाजी लेकुरवाळी

तीळ बाजरीची भाकरी न्यारी

मूग खिचडी चे जेवण आगळे

तीळ चटणी अन लोणी वेगळे


तिळगुळाची पोळी मोठाली

त्यावरी तुपाची धार सोडावी

खाऊन तृप्तता ढेकर देई

वामकुक्षी अंमळ जास्त होई


सांजवेळी काळी चंद्रकोर

त्यावरी दागिने मनोहर

हळदीकुंकू सख्यांसवे

लुटालुटींना नवा ऊत येई


तिळगुळाचे आदान प्रदान 

गोडबोलाचे शाश्र्वत दान

घेऊ तुझे माझे सुखाचे वाण 

तिळगुळ घ्या गोड गोड बोला.

...............................................

©पल्लवी उमेश 

14/1/24

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू