श्री राम
उगवेल नवा सूर्य,
सरेल रात्र काळी,
सजेल दिव्य टिळा,
आभाळाच्या भाळी...
ल्यावे वस्त्र भगवे,
नी केशरी टिळा भाळी,
चढवावे भगवे निशाण,
उंच उंच आभाळी...
आगमन राम प्रभूंचे,
होणार या भूतली,
स्वागतास रामरायाच्या,
अवघी धरा सजली...
लावा पणत्या दारी,
काढा सुरेख रांगोळी,
करा रोषणाई उद्या,
साजरी करा दिवाळी...
घरोघरी पुजावा,
राम सांज-सकाळी,
हिंदुत्वाच्या क्षितिजावर,
नवी पहाट आली...
©®सतीश कदम.९८२०९४९९५३.