पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आगमन



*आगमन*

कुसुमाकर अंगणी बहरला
मनी माझिया वसंत फुलला ॥धृ॥

शुष्क कोरडे तरूवर सारे
खेळत नव्हते गंधित वारे
आम्रतरूवरी मोहर दिसता
जीवनाला अर्थ लाभला
मनी माझिया वसंत फुलला॥१॥

वसंताचे होता आगमन
उन्मीलित ही सृष्टी तनमन
जीवनाची बाग बहरली
रोमरोम चैतन्ये भरला
मनी माझिया वसंत फुलला॥२॥

सुवर्ण चंपक धवल मोगरा
परिमळ मम अंतरी साठला
बाळा तव मखमली स्पर्शाने
जीवनाला अर्थ लाभला
मनी माझिया वसंत फुलला॥३॥

कमलपुष्प हे विकसित झाले
पाकळ्यातुनी हास्य उमटले
बोल चिमखडे पडता कानी
कोकिळरव घुमला
मनी माझिया वसंत फुलला॥४॥

अरूणा मुल्हेरकर
मिशिगन

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू