रचना के विवरण हेतु पुनः पीछे जाएँ रिपोर्ट टिप्पणी/समीक्षा

देवबाप्पा

देवा तुझे किती सुंदर आकाश

सुंदर प्रकाश सूर्य देतो //१//

सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर

चांदणे सुंदर पडे त्याचे//२//

सुंदर ही झाडे सुंदर पाखरे

किती गोड बरे गाणे गाती//३//

सुंदर या गायी सुंदर वासरे

सुंदर ते दूध देती बरे//४//

सुंदर वेलींची सुंदर ही फुले

तशी आम्ही मुले देवा तुझी//५ //

इतुके सुंदर जग तुझे जर 

किती तू सुंदर असशील//६//




टिप्पणी/समीक्षा


आपकी रेटिंग

blank-star-rating

लेफ़्ट मेन्यु