पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

आरसा

काचेच रुप केवळ
बाणा सुंदर सिल्व्हर
ऐतिहासिक वारसा
लाभला असा लोभस
आरसा.......

पुन्हा पुन्हा भेटलास
रुप घेऊनिया ऐसा 
कधी गोल कधी आधा
कधी वर्ग तिरकासा
आरसा......

सत्य दृश्य चित्रकार
ना साजे यास अंधार
रुप नटण्याची दिशा
रुबाब सरदारसा
आरसा......‌

स्वतः निहारती स्वतः
अति हाऊस माणसा
गुणदोष बोधप्रद
मत मांडतो स्पष्टसा
आरसा......

अगम्य नाजूक काया
लागता धक्का जरासा
प्रतिबिंब जायी वाया
पुन्हा अस्तित्व बारसा
आरसा.........

सौ. अर्चना संजय चंदनखेडे
मनीष नगर,
 नागपूर.






पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू