पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

परिक्रमेच्या मार्गावर

परिक्रमेच्या मार्गावर .........       

 

 

कल कल जल 

शांत नितळ निर्मळ 

स्वच्छंद शुभ्र निर्झर 

परिक्रमेच्या मार्गावर ..... 

 

रुंद अरुंद घाट 

आई रेवाचा पाट 

आहे इतिहास मुखर 

परिक्रमेच्या मार्गावर ..... 

 

मार्ग असाध्य दुर्गम 

दृढ संकल्प संयम 

मनात ‘नर्मदे हर’

परिक्रमेच्या मार्गावर ..... 

 

गंतव्याचा शोध 

आध्यात्माचा बोध

घे आशिर्वाद निरंतर 

परिक्रमेच्या मार्गावर ..... 

 

साधू संत योगी 

घोर तपस्वी त्यागी 

पूर्ण ज्ञानाची घागर 

परिक्रमेच्या मार्गावर ..... 

 

आशा उत्साह उमंग 

भजन किर्तन सत्संग 

आस्था झोळी भर 

परिक्रमेच्या मार्गावर ..... 

 

दर्शनाची आस 

मातेवर विश्वास 

‘हर कंकर शंकर’

परिक्रमेच्या मार्गावर ..... 

 

शुद्ध तृप्त अंतर्मन 

कृतार्थ मानव जीवन 

अक्षय आठवणी सुंदर 

परिक्रमेच्या मार्गावर. 

 

 

 

*******************************************

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू