पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रंगाचा सण

साहित्यप्रकार:-अद्याक्षरावरून काव्य लेखन. विषय:- धुलीवंदन असे असावे
 
पहिला दिवस होलिका दहन
 *धु* ळवंडी चा दिवस दुसरा..!
निगा राखा त्वचेची आपुल्या
 *ली* न रंग खेळण्यात होऊन नका विसरा!

अनेक रंगाचा हा सण
 *वं* श पररंपरा सणाची किती!
रितीरिवाज मराठी संस्कृतीचे
 *द* र्शविते यामुळे घट्ट नाती!

रंग अन गुलाल उधळूनी
 *न* ष्ट करुया आपआपसातील भेद!
गळे मिळुन आलिंगन देऊ
 *अ* से विसरुन जाऊ मतभेद! 

 *से* वा हाच धर्म अंगीकारुया 
 *अ* शांती समाजातील दुर करु!
 *सा* द घालु एकमेकांसोबत 
 *वे* ळ समाजाला देण्याची कास धरु..!

मोहन सोमलकर नागपूर

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू