पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

शब्द विसराळू कवी



शीर्षक --शब्द विसराळू ( अष्टाक्षरी रचना) 


उपक्रम सुरू झाला

काय करावे कळेना

कशी करावी कविता 

शब्द काही आठवेना


एक ओळ मनी येता

उभी राहते दुसरी

आठवते कधी तेव्हा

जाते पळून तीसरी 


कसे मोजायचे शब्द

काय करावे कळेना 

मात्रा विसरता कधी

अलंकार आठवेना 


कवितेची रूपरेषा

छान अशी ठरवतो 

विसरुनी ते यमक

काव्य मग हरवतो  

 

सांगा कुणीतरी मंत्र

काय करावे कळेना

विसरले हरवले

शब्द मज सापडेना 


कवी कसे संबोधावे

नेहमीच घडते ना 

सांगा खरंखुरं तुम्ही 

काय करावे कळेना 


*ओमप्रकाश शर्मा*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू