पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

रंगपंचमी



आज पाहिले रंगताना 
धरणीला ही रंग चढला
काळा-निळा,जांभळा-पांढरा,
लाल-पिवळा बरेच काही
एकत्र आले रंग सारे
रंगवण्या माणसाला
इथे त्यांनी पाहिला ना ?
जात-पात,पंथ,वंश
वर्ण कोणता,धर्म कोणता
आता तरी जाण माणसा 
त्याचे त्याने केले कर्म 
घडवण्या रंगालाही
लाल रंग येथे किती वाहिले
भ्रष्ट नेत्यापाही माझे
अखंड देश दुभागले
या रंगा सारखे कधी
येऊ का? एकत्र आपण
दुभागलेले देश आपले
पुन्हा अखंड जोडण्यासाठी
आज पाहिले रंगताना
धरणीला ही रंग चढला
स्वातंत्र्य होण्याच्या.......

*मुक्तछंद*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू