पुस्तक तपशिलाकडे परत अहवाल पुनरावलोकन

मातृभूमी



*मातृभूमी*

जन्मा आले कन्या म्हणुनी मराठी मातीत
अभिमानाने जगते आहे मातृभूमीत॥धृ॥

पावन भूमी संतांची अन् शिवाजी राजाची
गिरीशिखरे अन् कृष्णा गोदा तीर्थक्षेत्रांची
अभंग गाते नामा तुक्याचा मी मराठीत
अभामानाने जगते........॥१॥

चंद्रभागेतीरी विटेवरी उभा पांडुरंग
टाळ चिपळ्या गजर चालला भक्त नामी दंग
माउलींनी गीता कथिली ज्ञानेश्वरीत
अभिमानाने जगते..........॥२॥

साहित्याची गोडी लाविली गिर्वाणभारतीने
वेड लाविले वळणावरती बोली भाषेने
मल्हे तुल्हे काहून बोलती शब्द वर्‍हाडीत

अभिमानाने जगते..........॥३॥

आघाडीवर महाराष्ट्र माझा कलाक्षेत्रात
नृत्य नाट्य संगीत अवघ्या ललितकलांत
विसरू नका हो  मातेला जगा याच मातीत
अभिमानाने जगते आहे मातृभूमीत॥४॥

अरूणा मुल्हेरकर
मिशिगन
२७/०२/२०२४
*जागतिक भाषादिनाच्या शुभेच्छा*

पुनरावलोकन


तुमचे रेटिंग

blank-star-rating

डावा मेनू